माढ्याच्या जागेबाबत बुधवारपर्यंत निर्णय घ्या; राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम

0
576

पुणे, दि. १२ (पीसीबी) – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्यामुळे माढ्यातून कोण लढणार अशी चर्चा सुरू झाली असताना स्वाभिमानी संघटनेचे नेते व  खासदार राजू शेट्टी  यांनी या जागेबाबत बुधवारपर्यंत निर्णय घ्या, असा अल्टीमेटम  आघाडीला दिला आहे.

राजू शेट्टी म्हणाले की,  माढाची जागा आम्ही सुरुवातीपासून आघाडीकडे मागत आहोत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून लढण्याची घोषणा केली. त्यामुळे आम्ही या जागेची   मागणी करणे  सोडून दिले. परंतु शरद पवार आता निवडणूक लढणार नसल्याने पुन्हा आम्ही माढ्याच्या जागेची मागणी आघाडीकडे केली आहे.

दरम्यान,  पुण्यात पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये चौथ्या आघाडीबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शेट्टी-जानकर भेटीमुळे युतीतील नाराज मित्रपक्ष आणि आघाडीत जाऊ न शकलेले पक्ष एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरु  झाली आहे.