Maharashtra

माढा जिंकणारच, बारामती आणि साताराही जिंकू – मुख्यमंत्री फडणवीस

By PCB Author

April 18, 2019

सातारा, दि. १८ (पीसीबी) – माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज येथील पंतप्रधान मोदी यांची सभा महाराष्ट्रातील सर्व सभांचा रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा झाली आहे. त्यामुळे भाजप माढा जिंकणारच, त्याचबरोबर बारामती आणि साताराही जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यकत् केला.

महायुतीचे  सातारा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर  सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.  यावेळी अतुल भोसले, मदन भोसले, शेखर चरेगांवकर, दीपक पवार, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, अशोक गायकवाड, संतोष जाधव, भरत मोरे आदी  उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री  म्हणाले की,  शरद पवार एक उतुंग नेतृत्व आहे. मात्र, त्यांना काँग्रेस अध्यक्ष   राहूल गांधी यांचे नेतृत्व  स्विकारावे लागत आहे.  आता  पवारांची  अवस्था काय झाली. ओपनिंग बॅटस्‌मन म्हणून  मैदानात उतरले. आणि सातव्या दिवशी मी खेळत नाही म्हणून मैदान सोडून गेले.