माझ्या बदनामीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा वापर निंदनीय – महापौर माई ढोरे

0
682

पिंपरी, दि.८ (पीसीबी) – भारतातील मुलींना शिक्षणाचे दार खुले करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रत्येक महिलेला अभिमान वाटतो. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मी शिक्षण घेऊ शकले आणि त्यांनी दिलेल्या अधिकारामुळेच आज महापौरपदापर्यंत पोहोचू शकले याच मला पूर्ण भान आहे. परंतू माझ्या राजकीय बदनामीसाठी मी सावित्रीबाई यांच्याविषयी मी चुकीचे वक्तव्य केल्याचे पसरवले जात आहे.महिलांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबाई यांच्याविषयी स्वप्नातही चुकीचे बोलू शकणार नाही. एक महिला महापौर आहे म्हणून त्यांच्या बदनामीसाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणी राजकारण करणार असेल,तर या शहरातील नागरिक ते खपवून घेणार नाहीत. माझ्या राजकीय बदनामीसाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा वापर करणे निंदनीय असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.
या संदर्भात महापौर माई ढोरे म्हणाल्या, ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगवी येथे झालेल्या एका कार्यक्रमाला मी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा संदर्भ देऊन काही जण मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याचे पसरविले जात आहे. हे माझ्या राजकीय बदनामी च षडयंत्र आहे. या देशातील कोणतेही महिला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चूकुन सुद्धा चुकीचे वक्तव्य करू शकत नाही . कारण देशातील प्रत्येक महिलेला आज आपण कोणामुळे ताठ मानेने जगत आहोत, याची जाणीव आहे .आज देशातील महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी करत आहेत.पुरूषांच्या बरोबरीने आज महिलांना स्थान मिळाले आहे. हे सर्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलेला शिक्षणाची दारे खुली झाल्यामुळेच शक्य झाले आहे.
मी सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच शिक्षण घेऊ शकले, नंतर राजकारणात त्यांच्यामुळे प्रवेश करू शकले, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे मी गेल्या २४ वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे.मी चार वेळा नगरसेविका म्हणून निवडून आली आहे . उपमहापौर, स्थायी समिती यांसारख्या महत्त्वाच्या पदावर काम केले. आता महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. माझी उत्तरोत्तर होत असलेल्या राजकीय प्रगतीचा काही जणांनी धसका घेतला आहे.त्यामुळेच माझी बदनामी व्हावी म्हणून थोर महिलेविषयी मी चुकीचे वक्तव्य पसरविले जात आहे. परंतु ,अशा बदनामीमुळे माझे खच्चीकरण होईल, असे कोणाला वाटत असेल, तर त्यात त्यांना यश येणार नाही .
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मी शिक्षण घेऊन इथंपर्यंत आले आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच मी या शहराच्या विकासासाठी काम करत राहणार आहे.हे शहर स्मार्ट सिटी कसे होईल याकडे अधिक लक्ष देणार आहे.कोणी कितीही माझ्या बदनामीचा प्रयत्न केल्यास मी तसूभरही मागे हटणार नाही, एक महिला महापौराला बदनाम करण्यासाठी काही जण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतिल ही अपेक्षा नव्हती .माझी बदनामी केली तर एक वेळ चालेल, पण त्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा कोणाला आधार घ्यावसा वाटत असेल , तर ते निंदनीय असल्याचे माई ढोरे यांनी सांगितले,”