Maharashtra

माझ्यासारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची ईच्छा

By PCB Author

January 25, 2020

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमापूर्वी मनसेच्या नव्या झेंड्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षासाठी आता नवीन दिशा ठरवली आहे. ते पुन्हा चांगल्या प्रकारे काम करतील,” असे त्या म्हणाल्या. माझ्यासारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची आणि त्यांना फॉलो करण्याची खूप इच्छा असते. आता आपल्याला खऱ्या नेत्यांची गरज आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “याबाबत मला काही माहिती नसून सत्यतता पडताळावी लागले. शरद पवार यांची सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असावी. यामध्ये काही तथ्य नसेल असे वाटते. परंतु यावर मी काहीही बोलणार नाही.