माझ्याविरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा; सुप्रिया सुळेंचे आव्हान

0
603

सोलापूर , दि. २५ (पीसीबी) – माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारला दिले आहे. मी जर काही केलेच नाही, तर मला कशाची नोटीस पाठवणार.  सुरुवातीला थोडासा त्रास होईल. मात्र, शेवटी मीच जिंकणार, असेही त्या म्हणाल्या.   

खासदार  सुळे ‘संवाद ताईंशी’ या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी सुळे यांना पत्रकारांनी विचारले की तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहात, मात्र जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर आवाज उठवणार का?  या प्रश्नांवर उत्तर देताना त्या म्हणाल्या की,  मी म्हणते की मला ईडी किंवा सीबीआयची नोटीस पाठवूनच दाखवावी.

मी चॅलेन्ज देते, आपल्याला ईडी सीबीआयने नोटीस पाठवली तरी मला पर्वा नाही. मला संघर्ष करण्यास मजा येते, असे सांगून सुप्रिया सुळे यांनी  सरकारला थेट आव्हान दिले.