माझे अंगरक्षक नव्हे, तर मोदीच मला ठार मारू शकतात – अरविंद केजरीवाल

0
504

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना त्यांच्या अंगरक्षकांनीच मारले होते. त्याप्रमाणे मलाही माझे अंगरक्षक ठार मारू शकतात, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  म्हटले होते. मात्र या विधानांवर घुमजाव करत केजरीवाल यांनी माझे अंगरक्षक नव्हे, तर पंतप्रधान मोदीच  मला ठार मारू शकतात, असा खुलासा केजरीवाल यांनी ट्विट करून केला आहे.

आपल्या अंगरक्षकांविषयी अविश्वास दाखवून  अरविंद केजरीवाल एक प्रकारे दिल्ली पोलिसांवर अविश्वास दाखवत आहेत. तुम्ही स्वतःचे अंगरक्षक निवडू शकता. जर काही मदत हवी असेल, तर मला सांगा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, असे ट्विट भाजप नेते विजय गोयल यांनी केले होते.  यावर केजरीवाल यांनी खुलासा केला आहे.

दरम्यान,  भाजपचा मला ठार मारण्याचा डाव आहे.  एक दिवस ते मला ठार मारतील. माझ्या अंगरक्षकाकडूनच मला मारण्याचा कट भाजपने  आखला  आहे.  ज्या पद्धतीने माजी पंतप्रधान  इंदिरा गांधी यांना मारले. अगदी  त्याप्रमाणे मला मारले जाईल.  माझे अंगरक्षक हे भाजपला रिपोर्ट करतात, असे केजरीवाल यांनी पंजाबमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते.