माझा संबंध ‘मीटू’शी नाही, तर ‘युट्यूब’शी – रामदास आठवले

0
587

पुणे, दि. १४ (पीसीबी) – ‘मी टू’ प्रकरणातील  दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केले. माझा संबंध मीटूशी नाही, तर युट्यूबशी आहे, असेही त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत उत्तर दिले.

पुण्यात आज (रविवार) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दक्षिण मुंबई मतदारसंघातून आपण लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास शिवसेना ही जागा माझ्यासाठी सोडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आठवले म्हणाले की, मिटूबाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची आवश्यकता होती. केवळ एखाद्याला फसवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये. नाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे ते यावेळी म्हणाले.