माझा एनआरसीला पाठींबा पण सीएएला विरोध – राज ठाकरे

0
335

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – ‘माझे सीएएला समर्थन नसून बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला असे म्हणालो होतो. पण माझ्या वक्तव्याच्या प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला.’ अस म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माघार घेतली आहे.

ह्या पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे!

भारत म्हणजे धर्मशाळा आहे का? ह्या पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे!#मनसे_अधिवेशन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray

Gepostet von MNS Adhikrut am Samstag, 25. Januar 2020

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशातून लाखो मुसलमानांनी भारतात घुसखोरी केली असून, त्यांना हाकलून देण्याची गरज आहे. त्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा करत राष्ट्रीय नागरिक नोंदणीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.

बांग्लादेशी-पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढणार!

येत्या ९ फेब्रुवारी २०२० ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांग्लादेशी-पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढणार! #मनसे_अधिवेशन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray

Gepostet von MNS Adhikrut am Samstag, 25. Januar 2020

मात्र मनसेत सीएए आणि एनआरसी च्या मुद्द्यावरून मनसेत मत मतमतांतर झाल्यामुळे राज ठाकरेनी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.