माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जित

0
692

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) –  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी  आज (रविवारी) दुपारी हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जित  करण्यात आल्या. त्याच्या दत्तक कन्या नमिता यांच्या हस्ते त्या विसर्जित करण्यात आल्या.

यावेळी  अटलजींची नात नम्रता, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी आज  सैन्याच्या विशेष विमानातून डेहराडूनला आणण्यात आल्या. सकाळी कुटुंबीयांनी त्या स्मृतिस्थळावरून संचित केल्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांसोबत गृहमंत्री राजनाथ सिंह   होते.

अटलजींच्या अस्थी देशातील १०० नद्यांमध्ये विसर्जित  करण्यात येणार आहेत.  याशिवाय, २० दिवस देशातील सर्व राज्यांमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन केले आहे. दिल्लीत २० ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये संध्याकाळी ४ वाजता प्रार्थना सभा होणार  आहे. तर २३ ऑगस्ट रोजी लखनऊमध्ये  प्रार्थना सभा आयोजित केली आहे.

अटलजींच्या अस्थी मध्य प्रदेशच्या नर्मदा, सोन, चंबल, केन, ताप्ती, बेतवा, पार्वती नद्यांमध्ये विसर्जित  करण्यात येणार आहेत. यापूर्वी योगी आदित्यनाथांनीही अटलजींच्या अस्थी यूपीच्या सर्व नद्यांमध्ये प्रवाहित करण्याची घोषणा केलेली आहे.