Desh

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना सीआयडीने केले अटक

By PCB Author

September 05, 2018

पालनपूर, दि. ५ (पीसीबी) – गुजरात दंगल प्रकरणात नरेंद्र मोदींचा विरोध करणारे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना आज (बुधवार) गुजरात सीआयडीने अटक केली आहे. १९९८ मधील अमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

गुजरातमधील पालनपूर येथे १९९८ संजीव भट यांच्या पथकाने समरसिंह राजपुरोहित यांना अटक केली होती. राजपुरोहित हे वकील असून त्यांच्याकडून एक किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी माझ्या खोलीत अमली पदार्थ आणून ठेवले आणि मला खोट्या गुन्ह्यात अडकवले, असा दावा राजपुरोहित यांनी केला होता. भट हे त्याकाळी बनासकांठाचे पोलीस अधीक्षक होते.

गुजरात हायकोर्टाने या प्रकरणात गुजरात सीआयडीला तपासाचे आदेश दिले होते. तीन महिन्यात तपास पूर्ण करावा, असे हायकोर्टाने म्हटले होते. यानंतर गुजरात सीआयडीने केलेल्या तपासात राजपुरोहित यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे समोर आले. तसेच पोलिसांनी राजपुरोहित यांचे राजस्थानमधील निवासस्थानातून अपहरण केल्याचेही उघड झाले. अखेर पोलिसांनी बुधवारी भट यांच्यासह सात जणांना अटक केली. यात निवृत्त पोलीस निरीक्षक व्यास यांचा देखील समावेश आहे.