माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना बाधित

0
1222

पुणे, दि. ५ (पीसीबी) : हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली. योगेश टिळेकर यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारीणीत टिळेकर यांची ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

“दोन दिवसापूर्वी ताप आणि कणकण आल्याने माझी व मुलाची कोविड तपासणी करुन घेतली असता तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे.” असे आवाहन टिळेकर यांनी केले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी योगेश टिळेकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.