माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे निधन   

0
392

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री  अरूण जेटली  (वय ६६) यांचे आज (शनिवार) निधन झाले.  गेल्या काही दिवसांपासून  त्यांच्यावर एम्स रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

जेटली यांना ९ ऑगस्टला अस्वस्थ वाटत असल्याने  त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. हृदयाचे ठोकेही वाढले होते. काही दिवसांपासून त्यांना लाईफ केअर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात  जेटली अर्थमंत्री होते. परंतु त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता.