मागासवर्ग आयोगावर  राज्य सरकारचा दबाव; राधाकृष्ण विखे-पाटलांचा आरोप

0
548

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – मागासवर्ग आयोगावर  राज्य सरकारचा दबाव होता, असे सांगून आरक्षणाबाबात सरकार वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (रविवार) येथे केला. मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजासोबत सरकारची ठकबाजी सुरु असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला. 

सोमवारपासून (दि.१९) विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत विखे- पाटील बोलत होते.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने आरक्षणाचा अहवाल सादर करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केली. राज्यातील ज्या जनतेने ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा फ्लॉप केला, तीच जनता आता महाराष्ट्रातील ठकांनाही फ्लॉप करुन दाखवेल, असा विश्वास विखेंनी यावेळी व्यक्त केला.