मागाच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा सरकारचा प्रयत्न उधळून लावू – राधाकृष्ण विखे–पाटील

0
564

मुंबई, दि. २९  (पीसीबी) – भाजप सरकारने मागाच्या दाराने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, लातूर आणि नागपूरसह काही बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या घोषीत  करण्यात येणार आहेत. मात्र, ही सरकारची मक्तेदारी आहे. मात्र, सरकारचा हा प्रयत्न उधळून लावू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे –पाटील यांनी दिला आहे.

सरकार शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याची भाषा करत आहे. तर दुसरीकडे बाजार समित्या राष्ट्रीय घोषित करून याच शेतकऱ्यांचे अधिकार काढून घेतले जाणार आहेत. याबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे. तसेच न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे विखे-पाटलांनी सांगितले.

दरम्यान, बाजार समित्यांच्या या निर्णयाबाबत माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वागत केले आहे. राष्ट्रीय बाजार समित्या केल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. तर या निर्णयाचा भविष्यात शेतकऱ्यांना लाभच होणार आहे, असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.