महेश नवमी साजरी

0
422

पिंपरी, दि. 31 (पीसीबी): महेश नवमी म्हणजे माहेश्र्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस. समाजासाठी फारच महत्त्वाचा दिवस. पिंपरी-चिंचवड मध्ये माहेश्र्वरी समाजाची सुमारे ३००० परिवार आहेत. दरवर्षी हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोना सारख्या महाभयंकर संकटामुळे व सामाजिक बांधिलकी चे भान ठेवून हा कार्यक्रम मोजक्याच लोकांत करण्यात आला. भगवान महेश मुर्तिचे पुजन करून आरती करण्यात आली व भगवान महेशाला हे जगावरचे संकट लवकर दुर होवू दे असे साकडे घालण्यात आले. या कार्यक्रमासाठी महेश सांस्कृतिक मंडळ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष पांडुलाल सोनी, सचिव अशोक जाखेटे, पुणे जिल्हा माहेश्र्वरी समाजाचे माजी अध्यक्ष रामेश्र्वर लाहोटी, महिला अध्यक्षा मिनाक्षी सोमाणी, युवा अध्यक्ष भगवान पलोड तसेच महेश बैंकचे संचालक अजय लढ्ढा व माहेश्वरी सभासद उपस्थित होते.