महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन व महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशन च्या वतीने सर्व जातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

0
739
पिंपरी, दि.१२ (पीसीबी) –  पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन व महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशन यांच्या वतीने सर्व जातीधर्मीय सामुदायिक अविस्मरणीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिखलीतील, जाधववाडी येथील रामायण मैदानात पारंपरिक रितीरिवाजानुसार सामुदायिक विवाह सोहळा सोमवार दि.१६ मार्च सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी होणार आहे. सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून समाजातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांना लग्नासारखे शुभकार्य पार पाडण्यासाठी कर्जाच्या ओझ्याखाली जावे लागते. त्यांना मदत व्हावी व आपल्या हातून सामाजिक संवेदना जपत माजी महापौर राहुल जाधव यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व जातीधर्मीय ५५ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी ही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून महाराष्ट्राच्या विविध भागातील गोरगरीब, मध्यम वर्गीय लोकांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून आपणही सामाजिक कार्यात सहभागी व्हावे तसेच वधु-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, असे आवाहन  आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन व महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट, माजी मंत्री राम शिंदे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा (माई) ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी महापौर नितीन काळजे, मा. स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे तसेच प.पू गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या उपस्थित राहणार आहेत.