महेंद्रसिंह धोनी निवृत्तीनंतर आर्मी जॉईन करणार?

0
758
India cricketer Mahendra Singh Dhoni plays a shot during the fourth one day international (ODI) cricket match between India and West Indies at the Brabourne Stadium in Mumbai on October 29, 2018. (Photo by PUNIT PARANJPE / AFP) / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

मुंबई, दि. १५ (पीसीबी) –  टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेतली, तर तो काय करणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. धोनी निवृत्तीनंतर आर्मी जॉईन करण्याची शक्यता आहे. आर्मीमधील आव्हनात्मक पोस्टिंग मिळावी अशी धोनीची इच्छा आहे. धोनीला सियाचिनमध्ये पोस्टिंग हवी आहे, असे धोनीच्या जवळच्या मित्राने सांगितले आहे.

विश्वचषकात धोनीच्या कामगिरीबाबत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. धोनीने विश्वचषकात संथ गतीने फलंदाजी केल्याचा फटका टीम इंडियाला बसला, असा आरोपही अनेकांनी केला. त्यामुळे धोनीने आता निवृत्ती घ्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. अशातच धोनीच्या एका जवळच्या मित्राने धोनीची देशसेवा करण्याची इच्छा असल्याची माहिती दिली आहे.

धोनी काही महिन्यात सियाचिनमध्ये पोस्टिंग मागू शकतो. भारतीय सैनिक ज्याप्रकारे देशसेवा करतात, तशी देशसेवा धोनीला करायची आहे. धोनी लवकरच या सर्व विषयांवर बोलण्यासाठी आर्मीशी संपर्क साधू शकतो, अशी माहिती धोनीच्या एका जवळच्या मित्राने दिली आहे.