महिलेच्या लैंगिक छळातील संशयीत पादरी चर्चमधून निलंबित

0
452

कोट्टायम, दि. २६ (पीसीबी) –  महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या एका चर्चमधील पाच पादरींना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना केरळमधील कोट्टायम शहरात असलेल्या मलंकारा ऑर्थोडॉक्स सिरीयन चर्चमध्ये घडली.

याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील कोट्टायम शहरात असलेल्या मलंकारा ऑर्थोडॉक्स सिरीयन चर्चमध्ये एका महिलेसोबत पादरींनी लैगिंक छळ केला आणि तिला ब्लॅकमेक करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पादरींना चर्चमधून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, चर्चचे जनसंपर्क अधिकारी पी. सी. इलियास यांनी सांगितले की, या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरु आहे, यासंबधी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. तसेच, सोशल मीडियावर अनेक तक्रारी येत आहेत. मात्र, चर्चच्या चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहावी लागेल.