Pimpri

महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक

By PCB Author

November 02, 2021

कासारवाडी, दि. २ (पीसीबी) – गाडी घेण्यासाठी तसेच औषधोपचारासाठी महिलेकडून साडेपाच लाख रुपये घेऊन ते पैसे परत न करता तिची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत बालाजी इंटरप्रायजेस, कासारवाडी येथे घडला.

विशाल संपत कदम (वय 35, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 1) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीकडून गाडी घेण्यासाठी तसेच औषधोपचारासाठी पाच लाख 50 हजार 319 रुपये घेतले. ते परत न देता पैसे देण्यास टाळाटाळ करून विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.