महिलेचा विनयभंग प्रकरणी एकास अटक

0
308

हिंजवडी दि.15 (पीसीबी) : घरकाम शोधण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज व फोन करून महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) सायंकाळी शिंदेवस्ती, मारुंजी येथे घडली.

समाधान वाघ (रा. मारुंजी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मागील दोन महिन्यांपूर्वी मारुंजी येथे घरकाम शोधण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आरोपीला मोबाईल क्रमांक दिला होता. आरोपीने फिर्यादी महिलेला अश्लील मेसेज व फोन करून तिचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.