महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी साने चौकीतील ‘त्या’ सहायक पोलीस फौजदारास अटक

0
749

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – पतीसोबत झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी चिखली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या साने पोलीस चौकीत गेलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवून तसेच तिच्या मोबाईलवर फोन करुन आय लव्ह यू म्हणाल्या प्रकरणी साने पोलीस चौकीतील सहायक पोलीस फौजदार रामनाथ पालवे याला आज (रविवार) चिखली पोलीसांनी अटक केली आहे. शनिवारी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पालवे याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

पीडीत महिला १० ऑक्टोंबरला तिच्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी साने चौकीत आली होती. त्यावेळी राजेंद्र पालवे या सहायक पोलीस फौजदारास, मी आहे, तुम्ही घाबरू नका असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता पीडीत महिलेच्या मुलाच्या फोनवर फोन केला. आणि आईकडे फोन दे असे त्याला सांगितले. मुलाने आईकडे फोन दिल्यावर पोलिसाने त्यांची विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि थेट आय लव्ह यू म्हणाला. यावर पीडित महिलेने काही नागरिकांची मदत घेऊन चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी शनिवारी पालवे याच्यावर निलंबनाची कारवाई केली. तर आज (रविवार) चिखली पोलीसांनी त्याला अटक केली आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.