Pimpri

महिलेचा अंघोळीचा व्हिडिओ काढणा-या तरुणाला अटक

By PCB Author

June 19, 2021

देहूरोड, दि. 19 (पीसीबी) : महिला अंघोळ करत आसतानाचा व्हिडिओ काढणा-या 40 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि.18) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अजय विजय मोहिते (वय 40, रा. विकासनगर, देहूरोड) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचा आंघोळ करत असताना चोरून व्हिडीओ काढला. त्यामुळे आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 354 (क) अंतर्गत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे अधिक तपास करीत आहेत.