Maharashtra

महिला सुरक्षा प्रकल्पांचा आढावा घेत गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश

By PCB Author

February 07, 2020

मुंबई, दि.७ (पीसीबी)  – महिला अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. यात ‘डायल ११२’ हेल्पलाईन, मुंबई तसेच पुणे ‘सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प’, पोलीस ठाण्यांमधील सीसीटीव्ही प्रकल्प, निर्भया महिला सुरक्षा फंड अंतर्गत मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेत त्यांनी हे प्रकल्प गतीने राबविण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस विभागाला दिल्या.

राज्यभरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण प्रकल्प गतीने राबवावेत. महिला अत्याचाराच्या घटना पाहता पोलीस विभागाने त्यावर कठोर कारवाई करत वेळीच प्रतिबंध घालावा. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रकल्प हाती घ्यावेत असे आदेश दिले. @DGPMaharashtra pic.twitter.com/LPyTd2yp7s

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 7, 2020