महिला सशक्तीकरणासाठी आम्ही महिलांच्या नावावर घर दिले; मोदींचा लाभार्थ्यांशी मराठीतून संवाद!

582

शिर्डी, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळालेल्या लाभार्थींशी मोदींनी शिर्डीमध्ये चक्क मराठीतून संवाद साधला. महिला सशक्तीकरणासाठी आम्ही महिलांच्या नावावर घर दिले. आता तुम्हाला घर मिळाले आहे, तेव्हा मला मिठाई देणार का?, असे सवाल करत मोंदींनी शिर्डीमध्ये लाभार्थ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. साई संस्थानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. शिर्डी साई संस्थानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

शिर्डीच्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी लाभार्थ्यांना नंदूरबारला येण्याचे निमंत्रण दिले. मोदींनी यावेळी त्यांची नंदूरबारमधील चौधरी चायची आठवणही सांगितली. लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना ते म्हणाले, दलालाची साखळी संपत चालली आहे त्यामुळे ते त्रस्त आहे. घरासाठी तुम्हाला कोणाला लाच द्यावी लागली आहे का?, तुम्हाला लाच द्यावी लागली नाही याचे समाधान आहे.

महिला सशक्तीकरणासाठी आम्ही महिलांच्या नावावर घर दिले, मी गुजरातमध्ये असताना सोलापूरमधून मला जॅकेट बनवून पाठवले जायचे. तुम्हाला नवे घर मिळाले आहे त्यातून तुम्ही तुमचे नवीन आयुष्य सुरु करा, असे आवाहन मोदींनी यावेळी दिले.