महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्याची समाजाने दखल घ्यावी- गजानन चिंचवडे

0
797

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी. नागरिकांच्या जीविताचे तसेच स्थावर व जंगम मालमत्तेचे रक्षण व्हावे, यासाठी पोलिस बारा महिने चोवीस तास दक्ष असतात. स्वतःच्या कौटूंबिक जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडून कायद्याच्या रक्षणासाठी व सामाजिक स्वास्थ्य उत्तम रहावे या हेतूने पोलिस महिला कर्मचारी देखील अपार कष्ट करीत असतात. अशा महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा फक्त जागतिक महिला दिनाच्या दिवशीच सत्कार होण्याऐवजी नेहमीच त्यांच्या कार्याची व कर्तव्याची दखल समाजाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस फ्रेन्डस्‌ वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी केले.

पोलिस फ्रेन्डस्‌ वेलफेअर असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भोसरी, पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडूरंग गोफणे, चिंचवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे व विश्वजीत खुळे, पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष डोलारे, उत्कर्ष देशमुख, महिला पोलीस कर्मचारी कविता खरात, आरती निकम, स्वाती शिर्के, मनिषा कालेकर, नगरसेवक माऊली थोरात, शुभम चिंचवडे, प्रकाश जवळकर, किरण गांधी, निखील येवले, सागर पाचारणे, गणेश कटारनवरे, संपत बोराटे, सागर पुंढे, ॲड. पंजाब इंगळे, विशाल शर्मा, राजू कांगणे, शादाब पठाण, हेमंत दुराफे, अवधूत डांगे, निखील कलाटे आदी उपस्थित होते.