महिला पोलिस अधिकाऱ्यावर धावून गेल्याप्रकरणी जुन्नरच्या आमदारावर गुन्हा दाखल

0
637

जुन्नर, दि. १६ (पीसीबी) – जुन्नर विधानसभा मतदार संघाचे आमदार शरद भिमाजी सोनवणे यांचा विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार यांचा कार्यकर्ता योगेश भोंडवे याच्यावर बेकायदेशीर रेशनिंगच्या गव्हाची वाहतूक प्रकरणी कारवाई केली गेली होती. याचाच राग मनात धरून आमदार शरद सोनवणे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्यादी महिला पोलिस अधिकारी यांना मनास लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द उच्चारत अंगावर धावून गेले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार शरद भिमाजी सोनवणे जुन्नर विधानसभा मतदार संघ (रा. चाळकवाडी ता. जु्न्नर, पुणे) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी महिला पोलिस अधिकारी यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास कर्तव्यावर असताना आमदार शरद सोनवणे यांचा कार्यकर्ता योगेश भोंडवे हा बेकायदेशीर रेशनिंगच्या गव्हाची वाहतूक करत होता. यावेळी पिकअप गाडी पकडून त्यावर रितसर कारवाई फिर्यादी महिली पोलिस अधिकारी यांनी केली. याचाच राग मनात धरुन पोलिस ठाण्यात ४० ते ५० लोकांसमक्ष व पोलिस कर्मचाऱ्या समक्ष मी तुला माझे ऑफिसला बोलावूनही तु का आली नाही? असे म्हणत, मनाश लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच महिला पोलिस अधिकारी यांच्या अंगावर तावातावाने धावून फिर्यादी यांनी  केलेल्या रीतसर कारवाई बेकायदेशीर रेशनिंगच्या गव्हाची गाडी सोडवण्यासाठी दबाव टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस करत आहेत.