Maharashtra

महिला पोलिसासमोर पोलीस कॉन्स्टेबलने केले अश्लील चाळे; गुन्हा दाखल

By PCB Author

May 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – महिला पोलिसाकडे पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला नेहरुनगर पोलिसांनी रविवारी (दि.१२) अटक केली. ही धक्कादायक घटना कुर्ला पूर्वेला असणाऱ्या पोलीस वसाहतीत घडली.

प्राप्त माहितीनुसार, कुर्ला पूर्वेला असणाऱ्या पोलीस वसाहतीत पोलीस कॉन्स्टेबल ज्या इमारतीत राहतो त्याच्या समोरच्या बाजूला असणाऱ्या इमारतीमध्ये महिला पोलीस राहते. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास महिला पोलीस बालकनीमध्ये उभी असताना आरोपीने आपले कपडे उतरवले व अश्लील कृती सुरु केले. महिलेने लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला याबद्दल कळवले व आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. नेहरु नगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. विभागीय चौकशीचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.