महिला पत्रकार संबंधी चुकीचा मजकूर ट्विटरवर अपलोड केल्याने आमदार जिग्नेश मेवानीवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
382

पौड, दि. ५ (पीसीबी) –  पत्रकार शेफाली वैद्य यांच्याबाबत चुकीचा मजकूर व फोटो प्रसिद्ध करून बदनामी केल्याप्रकरणी गुजरात विधानसभेचे आमदार जिग्नेश मेवानी व त्यांच्या साथीदाराविरोधात शेफाली वैद्य यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश मेवानी यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व अन्य दोन साधू यांच्या फोटोबरोबर शेफाली वैद्य यांचे फोटो क्रॉप करून जोडले व ते ट्विटरवर अपलोड केले होते. या बदनामी प्रकरणी वैद्य यांनी पौड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. शेफाली वैद्य या पुणे शहरानजीक असलेल्या भुगाव येथे वास्तव्यास असल्याने त्यांनी पौड ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पौड पोलिसांनी सोशल मीडिया कायद्यातंर्गत जिग्नेश मेवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपासात पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली पौडचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक उद्धव खाडे करत आहेत.