महिला तिरंदाजांचे ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्य

0
254

नवी दिल्ली, दि.०७ (पीसीबी) : टोकियो ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून भारतीय महिला तिरंदाज जागितक ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी पॅरिसला दाखल झाल्या आहेत. ही स्पर्धा १७ जून पासून आहे.

भारतीय महिला संघात दिपीका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी या तिघींचा समावेश आहे. या तिघींचा सराव चांगला झाला असून, त्या नक्की ऑलिंपिक पात्रता मिळवतील असा विश्वास भारती तिंरादाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी सांगितले.

दीपिका टोकियोसाठी वैयक्तिक गटात पात्र ठरली आहे. मात्र, सांघिक प्रकारात भारतीय महिलांना अजून पात्रता सिद्ध करता आलेली नाही. पॅरिसमध्ये भारतीय महिलांचे लक्ष्य आता ऑलिंपिक पात्रतेकडेच असेल. या स्पर्धेतून अव्वल तीन संघ ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहेत.

चांदुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय महिलांना आता १० दिवस विलगीकरणात रहावे लागणार असून, ते अनिवार्य आहे. विलगीकरणाच्या कालावधीत भारतीय खेळाडूंना कमाल सरवाची संधी मिळावी यासाठी आम्ही वर्ल्ड तिरंदाजीकडे विनंती केली आहे. ते यातून योग्य तो पर्याय शोधतील असा विश्वास चांदुरकर यांनी व्यक्त केला. भारतीय पुरुष रिकर्व्ह संघ यापूर्वीच ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे.

या स्पर्धेसाठी कंम्पाऊंड संघ या आठवड्यात पॅरिसला रवाना होईल. चांदुरकर म्हणाले, कंपाऊंड स्पर्धा २१ जूनपासून सुरू होणार आहे. त्यांनाही १० दिवसाचे विलगीकरणे अनिवार्य आहे. तो कालावधी पाहूनच या आठवड्यात आपले तिरंदाज रवाना होतील.