“महिला अत्याचारांवर मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री अन् गृहमंत्र्यांच मौन हे राज्यासाठी खूप दुर्दैवी आहे”, भाजप नेत्याची संतप्त टीका

0
318

पुणे,दि.२५(पीसीबी) : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला, “कोविड सेंटरमधील महिलांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राज्य सरकारने आजपर्यंत किती दोषींवर कारवाई केली?, असा सवाल करत विचारणा केली आहे. आज पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाला चित्रा वाघ यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पुण्यासह राज्यातील महिलांच्या कोविड सेंटरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

यावेळी चित्र वाघ यांनी चीड व्यक्त करत ‘मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना महिला अत्याचारांवर घटनांवर व्यक्त देखील न व्हावंसं वाटणं हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे,’ असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.