Desh

महिलांनो परत जा, अन्यथा मंदिर बंद करू; शबरीमलाचे पुजारी संतापले

By PCB Author

October 19, 2018

केरळ, दि. १९ (पीसीबी) – शबरीमला देवस्थानाच्या दर्शनासाठी आलेल्या १०-५० वयोगटातील महिलांनी आताच परत जावे अन्यथा आम्ही मंदिराची दारं बंद करू असा इशारा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान मंदिराच्या प्रवेशापर्यंत पोहोचलेल्या दोन महिलांनाही मंदिर समितीने परत पाठवले आहे.

महिलांना प्रवेशाची परवानगी नव्हती. अय्यपा स्वामी ब्रह्मचारी असल्याच्या मान्यतेमुळे या महिलांना परवानगी नाकारली जात होती. पण काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महिलांना कोणीच मंदिरात जाण्यापासून रोखू शकत नाही असा निकाल दिला. त्यानंतर यात्रा सुरू होताच अनेक महिलांनी मंदिरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पण मंदिर समितीने कोणालाच पुढे येऊ दिलेले नाही. आतापर्यंत तीन पत्रकार महिलांनी मंदिरात जाण्याचा धाडसी पण अयशस्वी प्रयत्न केला. याबद्दल पुजाऱ्याला विचारले असता ते म्हणाले,’ शबरीमलाचे मंदिर हे काही स्त्रीस्वातंत्र्याचे मुद्दे सिद्ध करण्याची जागा नाही. मंदिरात येण्याआधी ४१ दिवस कडक उपास आणि अनेक पथ्य पाळावी लागतात. महिला त्या पाळू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी आताच परत जावं अन्यथा आम्ही मंदिरांची दारे बंद करू’ .