Maharashtra

महिन्याभरात माझे लग्न, अक्षता संपल्या म्हणू नका – खासदार उदयनराजे

By PCB Author

January 21, 2019

सातारा, दि. २१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांच्या  तारखा  मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना महिन्याभरात माझे लग्न आहे. काही महिन्यांनी सगळ्यांचेच लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका, संपल्या म्हणू नका, अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत आज (सोमवार) येथे केली. यावर उपस्थितांमध्ये  हस्याचे कारंजे उडाले.

पाटणमध्ये एका कार्यक्रमात  उद्यनराजे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी उदयनराजे  म्हणाले की,  महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री लाभला  आहे. फडणवीस यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेण्याचे धाडस सत्तेत असताना दाखवले आहे, तसे कोणीही दाखवले नाही. लोकनेते म्हणावेत असे खूप कमी नेते आहेत, समाजाची जाणीव असणारे खूप कमी नेते सध्या उरले आहेत, असेही उदयनराजेंनी म्हणाले.

या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी शंभूराजे देसाईंचेही कौतुक केले.  तसेच त्यांनी सरकारच्या कामाचे  भरभरुन कौतुक केले.  शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.