महावितरणकडून क्रिकेट प्रशिक्षक चव्हाण; पॉवरलिफ्टर मनीष कोड्रा यांचा गौरव

0
219

पुणे, दि. २९ (पीसीबी) – क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणारे व महावितरणमध्ये कार्यरत श्री. अजय चव्हाण व श्री. मनीष कोड्रा यांचा मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्याहस्ते गुरुवारी (दि. २८) रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, श्री. प्रकाश राऊत, कार्यकारी अभियंता श्री. माणिक राठोड, श्री. किशोर सोनपरोते, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर उपस्थित होते.

महावितरणच्या रास्तापेठ विभागाचे सहायक लेखापाल श्री. अजय चव्हाण यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र किक्रेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. दिल्ली व अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या विनू मंकड क्रिकेट चषक स्पर्धेत श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र संघाने १५ वर्षांनंतर थेट अंतिम फेरीत धडक दिली व स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले.

तसेच रास्तापेठ चाचणी विभागाचे तांत्रिक कर्मचारी श्री. मनीष कोड्रा यांनी औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ७४ किलो वजनगटात बेंचप्रेस प्रकारात १४२.५ किलो वजन उचलून विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टींग असोशिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. या दोघांचेही मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्यासह उपस्थितांनी कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.