Maharashtra

महाविकास आघाडी सरकार ७० हजार रिक्त पदे भरणार

By PCB Author

January 30, 2020

बीड, दि.३० (पीसीबी) – मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून, सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने तब्बल ७० हजार रिक्त पदांची महाभरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्त पदे असल्याने तातडीने महाभरती प्रक्रिया राबविण्याची मागणी मंत्र्यांनी केली आहे. महाभरतीच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करून प्रक्रिया सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील वर्ग-१ व २ यांच्यासहित तृतीय व चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदांचा आढावा जाहीर करावा. अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.