Chinchwad

म्हाळुंगेमध्ये बांधकाम साईटवरील चौथ्या मजल्यावरुन पडून पेंटरचा मृत्यू

By PCB Author

November 21, 2018

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – बांधकाम व्यवसायीकाने कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्ता न पुरवल्याने बांधकाम साईटवर पेंटिंगचे काम करण्यासाठी गेलेल्या एका पेंटरचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१८) महाळुंगे येथील स्वस्तीक माणस या बांधकाम साईटवर घडली.

राधेशाम रामबच्चन बर्मा (वय ३५, रा. सर्वे नं. १०/४/१ दगडु पाटीलनगर बारणे विट भट्टीजवळ, थेरगाव, मुळ रा. बौरब्यास, गावबौरब्यास संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) असे मयत पेंटरचे नाव आहे. याप्रकरणी राकेश रामबच्चन बर्मा (वय २५, रा. सर्वे नं. १०/४/१ दगडु पाटीलनगर बारणे विट भट्टीजवळ, थेरगाव, मुळ रा. बौरब्यास, गावबौरब्यास संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तुषार पाडाळे (वय ४५, रा. थेरगाव) आणि विजय बालवडकर (पूर्ण पत्ता मिळू शकला नाही) या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार पाडाळे आणि विजय बालवडकर यांची महाळुंगे येथील स्वस्तीक माणस कन्स्ट्रक्शन नावाची बांधकाम साईट सुरु आहे. त्या ठिकाणी राधेशाम बर्मा हे रविवारी दुपारी चारच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पेंटींगचे काम करत होते. यावेळी तोल जाऊन राधेशाम खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. काम करत असताना राधेशाम यांना आरोपींनी कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवली नव्हती. यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोपी मयत राधेशाम जाधव यांचा भाऊ राकेश याने केला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.