Pimpri

महाराष्ट्र हौसिंग बोर्डातून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

By PCB Author

October 05, 2019

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) –  बाजारात जाऊन येतो, असे कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडलेले श्यामराव रामभाऊ मोहिते (वय  ७६, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड एम ५, नागपूर चाळ)  हे बेपत्ता झाले आहेत.  सोमवारी (दि.३०) रात्रीपासून ते घरी परतलेले नाहीत.

त्यांनी अंगात निळया रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची शॉर्ट पँट परिधान केली आहे. पाच फूट उंच, पांढरे केस, मिशी असे त्यांचे वर्णन आहे. त्यांना मराठी बोलता येते. या वर्णनाची व्यक्ती कोणाला दिसून आल्यास येरवडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.  सामाजिक कार्यकर्ते, गजराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा निळकंठेश्वर मंदिराचे अध्यक्ष राकेश मोहिते यांचे ते वडील आहेत.

अधिक माहितीसाठी ७४९९७७६१४९  अथवा ९८५०३०४०९९  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.