महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ परीक्षेत समुद्धी मुरकुटे पुणे विभागातून प्रथम तर राज्यातून दुसरी

0
733

पुणे, दि,२२ (पीसीबी) –  डि फार्मसी जेएसपीएम, जयवंत इन्स्टीटयुट ऑफ फार्मसी, ताथवडे या विभागाच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या २०१९ उन्हाळी परीक्षेत घवघवित यश तर समुद्धी मुरकुटे हिने ९३.८० टक्के मिळवून पुणे विभागात प्रथम तर राज्यातून दुसरी घेऊन विद्यालयाचे नाव उज्वल केले. तसेच दिव्या चौधरी हिने ९२.०० टक्के मिळवून  दुत्तीय क्रमांक पटकावला, नेहा खान हिने ८९ टक्के मिळाले.

यावेळी संस्थापक म.रा.जलसंधारण मंत्री मा.प्रा.डॉ. तान्हाजीराव सावंत यांनी समुद्धी मुरकुटे व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच इस्टेट डायरेक्टर रवी सावंत, प्राचार्य पी. पी. हंबर व सर्व शिक्षकांनी यावेळी मार्गदशन केले, आणि पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.