‘महाराष्ट्र क्रांती सेना’ लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार – सुरेश पाटील

0
787

कोल्हापूर, दि. १९ (पीसीबी) – ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवण्यात येणार आहेत, अशी माहिती आज ( सोमवारी) मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील यांनी दिली. आऱक्षणासाठी भव्य मराठा मोर्चे काढल्यानंतर  दिवाळीत महाराष्ट्र क्रांती सेनेची रायरेश्वर येथे स्थापना करण्यात आली होती.  

साताऱ्याचे खासदर उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार नसतील. तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून लढवतील, असा विश्वास  पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी  व्यक्त केला.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चातून निर्माण झालेल्या ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाला मराठा समाजाचाच विरोध आहे. मराठा समाज सक्षम असून कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्थापनेची गरज नाही. त्यामुळे समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात येऊ नये. राजकीय पक्ष काढणारे सरकारचे हस्तक आहेत. त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी बघावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट व नानासाहेब माशेरे यांनी म्हटले.