महाराष्ट्र केसरीसाठी शनिवारी काळेवाडीत निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

0
1389

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ व कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र केसरीसाठी १५ डिसेंबर रोजी काळेवाडी येथे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. काळेवाडी, तापकीर मळा येथील काका होम्स समोरील पटांगणात भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता या स्पर्धेचे उद्घाटन केले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांनी शुक्रवारी (दि. ७) पत्रकार परिषदेत या स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली. या यावेळी नगरसेवक अबंदास कांबळे, प्रभाग स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, उपाध्यक्ष काळूराम कवितके, संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, सचिव धोंडिबा लांडगे, आयोजिक निलेश तापकीर, जयराम नढे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत जयराम नढे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच रहाटणी काळेवाडी परिसरातील नामांकित पैलवान बाबासाहेब तापकीर, वस्ताद रामतात्या नढे, श्रीराम कोकणे, चांगदेव नखाते, शंकरराव काळे, सुरेश पाटील, महादू कोकणे, महादेव नढे, सयाजी आप्पा नढे, साधू नढे, विजय नखाते (पंच), दिलीप नखाते, शिवराम नखाते, आनंदा काळे, गुलाबराव तांबे, ज्ञानेश्वर ब. नढे, ज्ञानेश्वर बा. नढे, शंकर नखाते, विलास नखाते, हरिभाऊ नखाते, सुदामराव नखाते, कैलास काळे, माऊली काळे, शंकर नढे, ज्ञानोबा काळे, दिलीप नढे, कृष्णा तांबे, अजय नढे, शिवराज तांबे, किशोर नखाते, देवा आप्पा नखाते, काळूराम नढे, जगदीश नढे, संतोष सुरेश नखाते, निलेश नखाते, शंकर चांदेरे, लहू कोकणे, काळूराम थोपटे, अरुण तांबे, अजय लांडगे, किरण नखाते, संतोष नखाते, आबा शिंदे यांना कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.