‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’ पाहण्यासाठी गेलेल्या इसमाच्या गळ्यातली सोन्याची चेन हिसकावून चोरटा फरार

0
830

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – बालेवाडी येथील श्री. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सुरु असलेली ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धा’ पाहण्यासाठी गेलेल्या एका इसमाच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन गरदीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेली. ही घटना शनिवारी (दि.१७) दुपारी एकच्या सुमारास बालेवाडी येथील श्री. छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या वीआयपी गेटजवळ घडली.

परसराम नारायण सोनी (वय ५७, रा. फ्लॅट नं.डी ६०३, लॅटीट्युड सोसायटी, डॉमिनोजजवळ, दत्त मंदिर रोड, वाकड) यांची सोन्याची चेन चोरीला गेली. त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी एकच्या सुमारास तक्रारदार परसराम सोनी हे बालेवाडी येथील श्री. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सुरु असलेली महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धा पाहण्यासाठी गेले होते. स्टेडियमच्या वीआयपी गेट जवळील गेटमधून प्रवेश करत असता गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सोनी यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेली. हिंजवडी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.