महाराष्ट्र अद्याप स्टेज ३ मध्ये नाही – राजेश टोपे

0
304

मुंबई,दि.९(पीसीबी) – महाराष्ट्र अद्याप स्टेज ३ मध्ये नाही, महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांची संख्या ११३५ वर पोहचली आहे तर आजपर्यंत १२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र अद्याप स्टेज ३ मध्ये नाही. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती नियंत्रणात आहे, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी काटेकोरपणे पाळावं असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात करोनाबाधितांचा मृत्यूदर ६ टक्के आहे. हा दर सरासरीपेक्षा जास्त आहे, असंही टोपेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जर बाहेर पडावं लागत असेल किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं आहे, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.