महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार,शस्त्रक्रियेनंतर सत्तासंघर्षावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

0
520

मुंबई, दि.१३ (पीसीबी)- महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. तीन पक्ष पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. त्यामुळे समान कृती कार्यक्रम आखण्यासाठी ठरावीक वेळ लागणारच. मात्र आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा निर्धार शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
अँजिओप्लास्टी झाल्यावर लिलावती रुग्णालयातून त्यांना आज डिस्चार्ज मिळाल. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे.
शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वाटाघाटी सुरू केल्यानंतर संजय राऊतांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.