Maharashtra

महाराष्ट्रात मुदतपूर्व विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत, लिहून घ्या – मुख्यमंत्री

By PCB Author

March 07, 2019

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – महाराष्ट्रात मुदतपूर्व विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत, लिहून घ्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा-विधानसभा  निवडणुका एकत्र होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

लोकसभेसोबतच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  मात्र, हे वृत्त पूर्णपणे निराधार आहे, यामध्ये कोणतेही तथ्य नाही,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खात्रीशीरपणे सांगितले .

दरम्यान, लोकसभा निवडणुकासोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्यासाठी राजधानी मुंबईत हालचाली सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी (दि.८)  तातडीने राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यानंतर  मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर करतील, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या सर्व चर्चा निराधार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.