Maharashtra

महाराष्ट्रातील ‘ही’ महिला खासदार म्हणते, संसदेत जय श्रीरामचे नारे नकोत

By PCB Author

June 17, 2019

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार)   सुरूवात झाली. अधिवेशनाच्या वेळी सर्व सदस्यांनी शपथ घेतली. या शपथविधीच्या वेळी जय श्रीरामचे नारे देण्यात आले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी आक्षेप घेतला आहे.

नवनीत कौर राणा  म्हणाल्या की,  मी सगळ्या देवांना मानते. सगळे देव एकच आहेत या मताची मी आहे. मात्र कुणाला तरी लक्ष्य करण्यासाठी जय श्रीरामचे नारे द्यायचे ही बाब योग्य नाही. संसदेत आम्ही सदस्यत्त्वाची शपथ घेत असताना काही खासदार जय श्रीरामचे नारे जोर जोरात देत होते. जय श्रीरामचे नारे देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्यासाठी मंदिरे आहेत. सगळे देव एकच आहेत यावर माझा विश्वास आहे.

दरम्यान, नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष खासदार आहेत. त्या अमरावतीतून निवडून आल्या आहेत. आता यावर  केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.