Maharashtra

महाराष्ट्रातील ‘या’ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

By PCB Author

May 09, 2021

कराड,दि.०९(पीसीबी) – कोयना धरण व परिसराला शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता २.९ व ३.०० रिश्टर स्केल अशी नोंदली गेली. पहिला धक्का २.५५ मिनिटांनी तर, लगेचच ३ ते ४ मिनिटांच्या अंतराने भूकंपाचा आणखी एक सौम्य धक्का जाणवला.

दोन्ही धक्क्यांच्या लहरी सौम्य असल्याने कुठेही कसलीही हानी झाली नाही. मात्र, जमीन थरथरल्याने लोक घराबाहेर पळाले. भूकंपाच्या धक्क्याचे केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात जावळे गावाच्या वायव्येला ८ किमी अंतरावर तसेच कोयना धरणापासून १३.६ किमी अंतरावर होते. या भूकंपांचे केंद्रबिंदू जवळपास ८ किमी खोल असल्याचे सूत्रांनी सांगितले.