महाराष्ट्रातील ‘ती’ बहुचर्चित खासदार भाजपच्या संपर्कात; केंद्रीय गृहमंत्री यांची दिल्ली येथे घेतली भेट

0
629

दिल्ली, दि, २५ (पीसीबी) – अमरावती लोकसभा मतदासंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यांने निवडणु आलेल्या खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसात त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. तसेच राणा यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट देखील घेतली आहे. नवनीत कौर राणा या भाजपमध्ये जाणार का हे पाहणे औत्सुक्याची बाब ठरणार आहे.

नवनीत राणा यांनी मात्र, मतदारसंघातील विकासकामांसाठी शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले. राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी ‘राजकारणात बदल होत राहतात’, असं सुचक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे राणा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक जोर चढला आहे.

लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून उतरल्या होत्या. तर त्यांच्या विरोधात युतीकडून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ उभे होते. मात्र नवनीत कौर राणा यांना कॉंग्रेस राष्ट्रवादीचा खंबीर पाठींबा असल्याने त्या बहुमतांनी विजयी झाल्या. तर आनंदराव अडसूळ यांना मोदींच्या सुप्तलाटेत देखील पराभव स्वीकारावा लागला.