Banner News

महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कधी होणार मतदान, जाणून घ्या

By PCB Author

March 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  सतराव्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशात ११ एप्रिल २०१९ ते १९ मे २०१९ या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान  घे्ण्यात येणार आहे.  तर २३ मे २०१९ रोजी  मतमोजणी होणार आहे.  महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी चार टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला मतदान होणार आहे.  

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.  त्यानुसार पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ७ जागांसाठी, दुसऱ्या टप्यात १८  एप्रिल रोजी १०  जागांसाठी,  तिसऱ्या टप्यात २३  एप्रिल १४ जागांसाठी तर चौथ्या टप्यात २९  एप्रिल रोजी १७  जागांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कधी होणार मतदान

११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात ७ जागासाठी मतदान होणार 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमुर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशिम

१८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात १० जागासाठी मतदान होणार

बुलढाणा

अकोला

अमरावती

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

सोलापूर

२३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यासाठी १४ जागासाठी मतदान होणार

जळगाव

रावेर

जालना

औरंगाबाद

रायगड

पुणे

बारामती

अहमदनगर

माढा

सांगली

सातारा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

कोल्हापूर

हातकनंगले

२९ एप्रिलला चौथ्या टप्प्यासाठी १७ जागासाठी मतदान होणार

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर मध्य

मुंबई दक्षिण मध्य

मुंबई दक्षिण

मावळ

शिरुर

शिर्डी