Maharashtra

महाराष्ट्रातील कराड जनता सहकारी बँकेनंतर ‘आणखी एका’ बँकेचा ‘परवाना’ RBI कडून रद्द

By PCB Author

December 25, 2020

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई करण्यात आली असून तिचा परवाना सुद्धा रद्द करण्यात लाल आहे. कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता आरबीआयकडून कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा (Subhadra Local Area Bank) बँकिंग परवाना रद्द झाला आहे. बँकेच्या कारभारातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा २४ डिसेंबरला आरबीआयने बँकेच्या गैरकारभारामुळे बँकिंग परवाना रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. बँकेचं कामकाज गुरुवारपासूनच बंद करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने आधीच सुभद्रा बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

‘सुभद्रा बँकेचे कामकाज सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल अशा पद्दतीने करण्यात आले होते. अशाच पद्दतीने त्यांना कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर जनतेच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’, आरबीआयने कारवाईमागील कारण सांगताना अशी माहिती दिली