महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची जबरदस्त बॅटिंग सुरु… अनेक ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
354

ब्रेकिंग अलर्ट..

पुणे, दि. 15 (पीसीबी) : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे.

▪️पुणे शहरात गेल्या दोन तासंपासून मुसळधार पाऊस सुरू
पुणे सोलापूर हायवे पावसामुळे बंद
▪️उजनी धरणाचे पाणी भिगवण हायवेवर आले आहे. सोलापूरकडे जाणारी वाहतूक लोणी काळभोर येथे थांबवली
सोलापुर दिशेने प्रवास करू नये
उजनी धरणाचे 42 दरवाजे उघडले आहेत.
▪️उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच प्रचंड नुकसान झालं आहे. अगदी काढणीला आलेला आणि काढून ठेवलेलं सुद्धा सोयाबीन अक्षरशा शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर वाहून गेलं.
▪️पंढरपूरातील सखल भागात नदी काठच्या लोकांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू…
▪️इंदापूर :-
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस …
इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी अनेक चारचाकी व दुचाकी वाहने गेली वाहुन ….
अनेक नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी ….
शेतकऱ्यांचे ही अतोनात नुकसान ….
▪️उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर सर्वत्र मुसळधार पाऊस… गेली तीन तासांपासून सुरू आहे मुसळधार पाऊस… शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
▪️पंढरपूरः उजनी धरणातून भीमा नदीत 2 लाख 25 हजार चा विसर्ग
तर वीर धरणातून 25 हजार क्युसेकचा विसर्ग
भीमा नदीत एकूण 2 लाख 50 हजारचा विसर्ग