Maharashtra

महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप सावंत यांना अखेरचा निरोप

By PCB Author

January 03, 2020

महाराष्ट्र , दि.३ (पीसीबी) – दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे. हा नरोप देताना महाराष्ट्रही गहिवरला आहे. संदीप सावंत यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातले सगळे लोक जमले. शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

संदीप सावंत २८ सप्टेंबर २०११ रोजी सैन्यात भरती झाले होते. १२ वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करुन १८ मराठा बटालियनमध्ये समाविष्ट असलेल्या संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. त्यांच्यामागे त्यांची पत्नी , एक मुलगी, आई-वडील, काका, चुलत भाऊ, बहीण असे कुटुंब आहे. संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्रही हळहळला.

१ जानेवारीला पहाटे नाईक संदीप सावंत आणि रायफलमॅन अर्जुन थापा या दोघांनाही दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. या दोघांनी दाखवलेले शौर्य देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची देशाला कायम जाणीव राहिल अशा शब्दात ले. कर्नल देवेंदर आनंद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.